वाडा, राम मंदिर आणि रामनवमी उत्सव
वाडा, राम मंदिर आणि रामनवमी उत्सव
(Shri Ramnavami Utsav in Konkan)
आणि त्यांच्या सोबत कोकणात जाता जाता मला कोकण माझाच वाटू लागला. मग गेल्यावर प्रत्येक वेळी विमलेश्वर (हे मंदिर वाडा गावामध्येच आहे), कुणकेश्वर, विजयदुर्ग, तिथला रामेश्वर यांच्या दर्शनाला जाणं व्हायचं. पण या सगळ्यांपेक्षा मला विजयदुर्ग जास्त आकर्षित करायचा.
मे महिन्याच्या सुट्टीत तर आंबे, फणस, रातांबे यांची चंगळच असायची. जेवणात सोलकढी मी तिथेच पहिल्यांदा प्यालो. काय ती स्वर्गीय चव... आहा! माझं दुसऱ्या क्रमांकाचं आवडतं पेय म्हणजे सोलकढी. पहिल्या क्रमांकावर आज देखील (आणि आजन्म) कोल्हापूरचं पाणी. त्यानंतर ऊसाच्या रसाचा नंबर येतो.
असो... आपण कोकणात होतो.
एकदा श्री रामनवमीच्या उत्सवानिमित्य वाड्याला जाण्याचा योग्य आला. त्यांच्या घराजवळ श्री रामाचं मंदिर होतं. चार पाच दिवस चालणारा तो उत्सव. त्याची सगळ्या गावकऱ्यानी एकत्र येऊन केलेली जय्यत तयारी, संध्याकाळी किर्तन-प्रवचनाला बाहेर गावाहून आलेले किर्तनकार; हे सगळं माझ्यासाठी विलक्षण आनंददायी होतं. त्या रामनवमीला तीसेक वर्षे सहज झाली असतील. पण अनेक आठवणी आज देखील ताज्या आहेत.