Anti Spit Movement Kolhapur

Go to content

Anti Spit Movement Kolhapur

Mandar Vaidya : master in web & graphics
Published by Me in Social Kolhapur · 18 September 2020
Tags: AntisplitmovementKolhapur

थुंकता तुम्ही आणि आजारी पडतो आम्ही

Anti Spit Movement Kolhapur

अनेक पर्यावरण पूरक आणि सकारात्मक सामाजिक चळवळींची जन्मभूमी म्हणजे कोल्हापूर. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मूर्तीदान आणि निर्माल्य दानाची चळवळ इथं सुरु  झाली. आणि आज ती सर्वदूर रुजली देखील आहे.

सद्विचारानं, सातत्यानं प्रबोधन करणारे संयमी कार्यकर्ते, त्यांचे विचार समजून घेणारे आणि त्यानुरूप स्वतःमध्ये बदल करणारे नागरिक यांचा एक सुंदर मिलाफ कोल्हापुरात पाहायला मिळतो.

या मिलाफातून आणखी एक चळवळ सुरु होत आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर वगैरे थुंकण्याला आळा घालणारी चळवळ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक  ठिकाणी थुंकणे किती धोकादायक आहे हे आता वेगळे सांगायची गरज उरलेली नाही. सगळ्या जगानं ते मान्य केलं आहे. काही लोकांच्या अशा वागण्यामुळे पसरलेली रोगराई किती घातक स्वरूप धारण करू शकते ते आपण पाहतो आहोत.

चला...
सगळे जण या चळवळीमध्ये सामील होऊ !
चळवळीला दिशा देऊ !! ताकदीने ही कृती पुढे नेऊ !!!

संपर्क :
आनंद अगळगावकर - 9922335299
सरीकाताई बकरे - 9422429668

सार्वजनिक आरोग्याच्या दिशेने उचललं हे पाऊल... 'लाईक' करा, 'शेअर' करा.




Created by Me for You.
Back to content